एक बोध कथा…
वाल्मिकी ऋषींनी ‘रामायण ” लिहून पूर्ण केले .त्यांनी ते देवर्षी नारदाना वाचायला दिले . नारदांनी ते वाचून सांगितले कि ” हनुमान ” रचित रामायण , हे तुमच्या रामायणा पेक्षा खूप सुंदर आणि भक्तिपूर्ण आहे. वाल्मिकी म्हणाले , ” काय ? त्या माकडाने पण रामायण लिहिले आहे ? ” वाल्मिकींना हे आवडले नाही. मग, कोणाचे रामायण चांगले आहे ? हि जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देईना ..ते हनुमानाच्या शोधात फिरू लागले .
शोधता शोधता ते कर्दळी वनात, केळ्यांच्या बागेत आले . तेथील सात मोठ्या केळीच्या पानांवर रामायण कोरलेले त्यांनी पाहिले . त्यांनी ते संपूर्ण वाचले . त्यांनाही ते खूप भावले . अगदी योग्य शब्द , व्याकरण, व्याप्ती, भाषेचा ओघ, व ओघवती रसाळ भक्तिपूर्ण रचना ह्यांनी ते नटलेले होते. वाल्मिकींना ते सहनच झाले नाही . ते रडू लागले , ते स्वतःला आवरू शकले नाहीत.
“एवढे वाईट आहे का ?” हनुमानाने मागून विचारले. वाल्मिकी म्हणाले, ” खूप सुंदर आहे .” हनुमान म्हणाले ,” मग, तुम्ही का रडत आहात ? ” वाल्मिकी म्हणाले ,” आता, तुझे रामायण वाचल्यावर माझे रामायण कोणीही वाचणार नाही “.
हे ऐकल्यावर हनुमानाने ती सातही केळीची पाने फाडून टाकली ..चला, आता कोणीही हनुमानाचे रामायण वाचणार नाही .
हनुमान म्हणाले, माझ्या रामायणा पेक्षा तुम्हाला तुमच्या रामायणाची गरज आहे . जगात लोकांनी तुम्हाला वाल्मिकी म्हणून ओळखावे म्हणून तर तुम्ही रामायण लिहिले . माझे तसे नाही . मला माझा राम माझ्या सोबत सतत हवा म्हणून मी रामायण लिहिले .
त्याच क्षणी वाल्मिकींना जाणीव झाली कि मी एका हव्यासा पोटी रामायण लिहिले पण मला राम हा समजला च नाही . मी एका इर्षेपोटी रामायण लिहित गेलो, ते सत्य जगाला सांगण्याच्या गुर्मीत रामाला विसरून गेलो. मी रामायण लिहिले ते माझ्या तल्या “मी” ला सुखावण्या साठी , ती माझी महत्वाकांशा होती . हनुमानाने रामायण लिहिले ते त्याच्या ” रामावरील भक्तिपोटी ” . राम त्याचा सर्वस्व आहे आणि म्हणूनच ते जास्त सुंदर आहे .
रामा ” पेक्षा रामायण मोठे नाही. ज्याला राम कळला त्याला रामायण समजले कि नाही ह्याचा काहीच फरक पडत नाही .
|| श्री राम समर्थ ||
🙏🙏🙏