!!!..श्री राम समर्थ..!!!

!! मंदिरात कासव असण्याचे महत्त्व काय आहे !!

मंदिरात कासव_all life fun

आपणास माहिती आहे का कासव (मादी) ही आपल्या पिल्यांना कधीच दुध पाजत नसते तिने आपल्या पिल्लाच्या डोळ्यात वात्सल्य भावनेतून पाहिले की पिल्लाचे पोट भरते त्या प्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्या कडे वात्सल्य भावनेने पाहावे ज्यामुळे न मागता आपल्या सर्व ईच्छा पुर्ण व्हाव्या उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते.

कासव म्हणजे श्रीविष्णूचा साक्षात कूर्म अवतार आहेत. श्रीविष्णूच्या आशीर्वादामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते, कासव हा जीव सत्त्वगुणप्रधान असतो. त्याला त्याच्यातील सत्त्वगुणामुळे ज्ञानही प्राप्‍त होत असते. या ज्ञानामुळेच त्याला `स्वत:ची कुंडलिनी जागृत व्हावी’, अशी इच्छा निर्माण झाली.

कासवाने श्रीविष्णूला प्रार्थना केल्यावर त्याने कासवाला मंदिरात गाभार्‍याच्या समोर स्थान प्राप्‍त होण्याचा आशीर्वाद दिला. त्यामुळे प्रत्येक मंदिराच्या गाभार्‍यासमोर कासव असते.

कासवाचे गुण:-

१. शरणागत भाव असणे : यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते. त्याचे संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणांकडे असते.

२. सत्त्वगुण वृद्धीसाठी सतत प्रयत्‍नरत असणे : काही मंदिरांमध्ये कासवाची मान वर उचललेली असते. मान वर उचलणे, म्हणजे कुंडलिनी जागृत होणे व देवतेकडून प्रक्षेपित होणार्‍या सत्त्वलहरी ग्रहण करण्याची कासवाची धडपड दर्शवणे.

३. आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा असणे : आध्यात्मिक उन्नतीची तीव्र इच्छा असल्यामुळेच कासव मंदिरात कायम स्वरूपी रहाते.कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याचा भावार्थ कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ `कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्‍वराचे खरे दर्शन घडते’, असा आहे.

आपल्या घरात पितळाचे कासव ठेवावे कूर्म म्हणजे श्रीविष्णूला आपल्या घरात ठेवल्याने श्रीविष्णू सोबत श्रीमहालक्ष्मी वास आपल्या घरात राहतो

घरात देवा समोर अथवा तिजोरी समोर उत्तर दिशेला तोंड करून पाण्यात ठेवावे त्यातील पाणी रोज पुर्ण घरात शिंपडावे

आपण यश मिळविण्यासाठी अपार मेहनत करतो. दिवस-रात्र एक करतो. तरीही अनेकदा यश मिळत नाही. अनेकदा याचे मुख्य कारण तुमच्या घरातही असू शकते. वास्तुदोष असल्यास तुमच्या वाटचालीत अडथळे निर्माण होऊ शकतात. हे दोष दूर करण्यासाठी आधार घ्यायला हवा. साधनांच्या आधारे आपल्या यशातील अडथळे दूर करता येतात. यासंदर्भात खालील टिप्सचा वापर करा.

वास्तुदोष दूर करण्यासाठी कासव फार गुणाचे आहे. घरात कासव असेल तर घरातील रोग व शत्रू दूर रहातात.

करीयर किंवा नोकरीत पुढे जाण्यासाठी धातुनिर्मित कासव घरात आणा. त्याला पाणी भरलेल्या जारमध्ये किंवा भांड्यात ठेवून उत्तर दिशेला ठेवा.

कासव स्वतः दीर्घायुषी (120 वर्ष आयुष्य आहे कासवाला) असते. त्यामुळे घरातील व्यक्तींनाही दीर्घायुष्य लाभते