महाशिवरात्रीला अशी करा उपासना

माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसर्‍या दिवशी व्रताची सांगता केली जाते.

महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात. महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक कात आहे.

`महाशिवरात्री’ म्हणजे काय ? : पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला `महाशिवरात्री’ असे म्हणतात.

महाशिवरात्रीचे व्रत का करावे ? : शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्त्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधि-अवस्थेत जातो. शिवाची समाधि-अवस्था म्हणजे शिवाने स्वत:साठी साधना करण्याचा काळ. त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्त्व स्वीकारत नाही. त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो. त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्त्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे.

व्रत आचरण्याची पद्धत व विधी : उपवास, पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत. शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त रहावे. शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा कराव्या, असे विधान आहे. त्यांना `यामपूजा’ असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्त्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहातात. तांदुळाच्या पिठाचे २६ दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी १०८ दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात, त्यांनी अर्घ्य द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारण्याला ब्राह्मणभोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्ती करावी.

शिवपूजेची वैशिष्ट्ये : १शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात.२. शिवाच्या पूजेत हळद-कुंकू वापरत नाहीत; मात्र भस्म वापरतात. ३. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात.४. शिवाक्षाला तांदुळ, क्वचित गहू व पांढरी फुले वाहातात. ५. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्राकृती प्रदक्षिणा घालतात.महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्त्व : महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीतजास्त करावा.

हिंदू धर्मग्रंथामध्‍ये भगवान शिवशंकराच्‍या पूजेचे विशेष महत्व सांगण्‍यात आले आहे. शिवशंकर भक्‍ताला लवकर प्रसन्न होणारे देव म्‍हणून ओळखले जातात. शिवशंकराची भक्‍ती केल्‍यानंतर संसारीक जीवनात येणा-या संकटापासून सुटका होते. शिवशंकराच्‍या पूजेसाठी सोमवार हा दिवस विशेष मानला जातो. आज प्रदोष तिथिमुळे दुर्लभ योग आलेला आहे. आजच्‍या सोमवारी शिवशंराच्‍या पूजेला विशेष महत्त्व प्राप्‍त झाले आहे. या पूजेमुळे तुमच्‍या सर्व इच्‍छा पूर्ण होतील. आज हे तीन उपाय केले तर तुमच्‍या सर्व मनोकामना पूर्ण होतील, अपेक्षीत जोडीतदार मिळेल.

स्‍नान केल्‍यानंतर शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर जल स्‍नान घाला. जल स्‍नानाचा विधी करताना खाली दिलेल्‍या मंत्राचे स्‍मरण करा.
“ॐ महाशिवाय सोमाय नम:”
शिवलिंगाला स्‍नान घातल्‍यानंतर गायीचे दूध अर्पण करा. हा उपाय केल्‍यानंतर तुमच्‍या सर्व इच्‍छा पुर्ण होतील.

शिवलिंगावर मध अर्पित करा. मधाची धार आपर्ण केल्‍यानंतर व्‍यावसाय आणि नोकरीमधील समस्‍या दूर होतील.

यानंरत शिवलिंगाला जलस्‍नान घातल्‍यानंतर स्‍वच्‍छ करा. चंदनाचा तिलक लावा. चंदनाचा तिलक शिवशंकराला लावल्‍यानंतर जिवनात शांतता स्‍थापीत होते.

शिवपूजा करताना हे तीन उपाय केल्‍यानंतर गंध, अक्षत, फूल, नैवेद्य अर्पित करून शिव आरती करा. असे केल्‍यानंतर तुमच्‍या सर्व इच्‍छा आणि मनोकामपा पूर्ण होतील.

II अवधुतचिंतन श्रीगुरुदेवदत्त II