🖌मुक्त कविता🖌

🎼सदाफूली नी सोनचाफा🎼

all life fun

सदाफूली बडबडून
काढतेय वाफा,
असा कसा रे तू
मूक सोनचाफा?

नसेना का गंध
हसमूख मी,
सुगंधी असून तुझी
शांततेची हमी

माझी उंची कशी
सदाच खुरटलेली,
तू मात्र कायम
डोळे दिपविली

नसे मला कधी
देवपूजेचा मान,
तू बिनधास्त मिरतो
वेणीत छान

मोहक रंगाने मी
कुंपण सजविते,
तुझी छबी मस्त
सुवर्णात खुलते

दिवास्वप्न बघूनी
मनमुराद रमते,
टक लावून सदैव
न्याहाळत बसते.

…….

जयश्री पाटील