Dasbodh

🌺🌹।।श्री।।🌹🌺
सदगुरू स्वत्वाची जाण
सदगुरू श्रध्देचे स्थान
सदगुरू असे महान
सकल जगी II

सदगुरू कैवल्य चांदण
सदगुरू मुक्तीचे साधन
सदगुरू जीवन सांधणं
जाणताहे II

सदगुरू सामर्थ्य चित्ती
सदगुरू तेजाची प्रचिती
सदगुरू चैतन्याची सृष्टी
निर्मिताहे II

सदगुरू वाणी साखर
सदगुरू मायेची पाखर
सदगुरू ज्ञानाचा सागर
अथांग आहे II

एकलव्याची शिष्यता
तीरकमानी एकाग्रता
त्याची सदगुरुंठायी आस्था
ज्ञात आहे II

सदगुरूविण नाही भेद
सदगुरूविण नाही बोध
सदगुरूविण नाही शोध
ईश्वराचा II

.ऐसी सदगुरूंचिये लक्षणे
पुन्हा न लगे सांगणे
म्हणोनि सदगुरूंचिये चरणे
लोटांगण !!👏👏👏
🌺🌺॥जय सदगुरु॥🌺🌺

Theme by Mind Riders Technology